नवी मुंबईतल्या खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई
September 27, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न करता, तसंच परवानगी नसताना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या नवी मुंबईतल्या दोन खासगी रुग्णालयांवर नवी मुंबई महानगर पालिकेनं प्रती एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी दिली.

तसेच या रुग्णालयांमधे सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना राज्य सरकारने जारी केलेल्या दर पत्रकानुसार दर आकारणी करावी, अशाही सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.