नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा- राहुल गांधी
August 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा, असं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.

सरकारनं या परीक्षा घेण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे.