न्यूझीलंडच्या पंतप्रधान यांनी तिथली निवडणूक पुढच्या महिन्यात ढकलली
August 18, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तिथली सार्वत्रिक निवडणूक एक महिन्यानं पुढं ढकलली आहे. गेल्या आठवड्यात ऑकलंड शहरात पुन्हा कोरोनाबाधित आढळल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आर्देन यांनी हा निर्णय घेतला आहे. १९ सप्टेंबर ऐवजी आता १७ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.