पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले
August 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांना गमावलेल्या कुटुंबांप्रती मी सहवेदना प्रकट करतो. दुर्घटनेतील जखमींना लवकरच बरे वाटावे ही प्रार्थना . आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी स्थानिक पथके आणि एन डी आर एफ टीम घटनास्थळी हजर आहेत.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.