पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरा
July 8, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी किला राया पिथोरा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या आवारामध्ये वृक्षारोपण केल.

या स्मारकांच्या नूतनीकरणाच्या कामाचा आणि पुरातत्व विभागामध्ये सुरू असलेल्या हस्तलिखित जतन करण्याच्या कामाचा पटेल यांनी आढावा घेतला. देशभर सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित सर्व कार्यालयं, शिक्षण संस्था आणि मान्याताप्राप्त संस्थांनी आपल्या आवारामध्ये वृक्षारोपण कराव, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशाचा औषधी वारसा असलेली आवळा, पिंपळ, अशोक, बेल या वृक्षांच रोपण करण्यात याव अशी शिफारसही पटेल यांनी केली.