पंतप्रधान येत्या ३० ऑगस्टला मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार
August 17, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३०  ऑगस्टला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ६८ वा भाग असेल.

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी नमो अॅप किंवा माय जीओव्हीवर अथवा १९२२ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपल्या सुचना पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.