पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन
July 26, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री साडेआठच्या सुमारास  भागातील ताबारेषेवर अंदाधुंद गोळीबार तसंच बॉम्ब गोळ्यांचा मारा केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

काल रात्री उशीरा शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हाही दोन्ही सैन्यांदरम्यान चकमक सुरू होती. मात्र त्यामध्ये कुठल्याही स्वरुपाची हानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही, असंही या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं.