पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
July 24, 2020 • महेश आनंदा लोंढे

विभागात कोरोना बाधित 77 हजार 826 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 77 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 30 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 849 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.60 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील 63 हजार 808 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 38 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 720 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 775 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 841, व पुणे कॅन्टोंन्मेंट 210, खडकी विभागातील 40, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 769, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 123, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 270, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 40 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 76, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 586 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 538 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 864, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 272, सांगली जिल्ह्यात 62 तर कोल्हापूर जिल्ह्यात 245 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 848 रुग्ण असून 1 हजार 538 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 213 आहे. कोरोनाबाधित एकूण 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 6 हजार 599 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 989 आहे. कोरोना बाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 244 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 743 आहे. कोरोना बाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 327 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 109 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 138 आहे. कोरोना बाधित एकूण 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 84 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 79 हजार 900 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 89 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 1 हजार 295 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 77 हजार 826 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 24 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)