पुण्यातल्या वार्ताहराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी होणार
September 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे इथल्या कोविड रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यामुळे एका खासगी वृत्त वाहिनीत काम करणाऱ्या पांडुरंग रायकर या कोरोनाबाधित वार्ताहराचा मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारी हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं विरोधी पक्षांनी आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.