पुण्यात “मिशन झिरो” हा उपक्रम पुन्हा सुरु होणार
July 22, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुन्हा एकदा “मिशन झिरो” हा उपक्रम सुरु केला जाणार आहे.

नाशिकमध्येही मिशन झीरो उपक्रमाला काल सुरुवात झाली. नाशिक शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असून पाच हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि भारतीय जैन संघटनेनं मिशन झिरो ही मोहिम सुरू केली आहे.