भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेबरमध्ये होणार
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्फी येत्या नोव्हेबर मध्ये वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हा चित्रपट महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर मध्ये गोव्यात होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव भरवण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. गोव्यातले विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही मागणी केली आहे.