भारताच्या कृषी आणि औद्योगिक विकासासाठी आरसीएफचे भरीव योगदान
July 30, 2020 • महेश आनंदा लोंढे

चालू आर्थिक वर्षात आरसीएफने त्याच्या औद्योगिक उत्पादनांच्या एकूण विक्रीत 200 कोटींचा टप्पा केला पार

नवी दिल्‍ली : कोविड-19 ची आव्हानात्मक परिस्थिती असूनही रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) हा उपक्रम आपले परिचालन सुरु ठेवण्यात यशस्वी ठरला असून त्यांनी चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 27 जुलै 2020 पर्यंत त्याच्या औद्योगिक उत्पादनांच्या विक्रीत 200 कोटींचा टप्पा पार केला 

कंपनीच्या निवेदनानुसार 100 रुपयांचा पहिला टप्पा  67 दिवसांत तर पुढील 100 कोटीचा टप्पा केवळ 51 दिवसातच पार करण्यात आला.

आरसीएफच्या औद्योगिक उत्पादने विभाग (आयपीडी) कडे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 23 उत्पादने आहेत जी औषधे, कीटकनाशके, खाण, बेकरी उत्पादने, तंतू, चामडे सारख्या  इतर उद्योगांसाठी महत्वाचे घटक आहेत. या कठीण परिस्थितीत देशाच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आरसीएफ एक मजबूत प्रेरक शक्ती राहिली  आहे.

"अन्न सुरक्षा" सुनिश्चित करण्यात  कंपनीने मोठे योगदान दिले आहे आणि शेतकऱ्यांना खतांचा अखंड पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षात कोविड महामारीमुळे  विशेषतः  पुरवठा साखळीसंदर्भात वाहतुकीत अनेक अडचणी असूनही  आरसीएफला 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 5.9 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त खतांचे उत्पादन करण्यात यश आले आहे. कंपनीने जुलै 2020 महिन्यात 2.3 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक खताची निर्मिती केली आहे.