भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
July 5, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात भारत चाचणी संचांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे, हे एक मोठ यश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार भारतानं पहिल्यापासूनच गांभीर्यानं उपयोजना केली आहे असं स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. भारतानं आता डाटा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं अशी सूचनाही त्यांनी केली.