भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय
August 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे.

बँकेच्या केंद्रीय मंडळाची आज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय आपत्कालीन निधीची मर्यादा साडेपाच टक्क्यापर्यंत ठेवायचा निर्णयही या बैठकीत झाला असं, बँकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती तसंच अर्थव्यवस्थेसमोरच्या जागतिक आणि स्थानिक आव्हानांविषयी बैठकीत चर्चा झाल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल, आणि वार्षिक लेखा विवरणालाही या बैठकीत मंजुरी मिळाली.