भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनवणार
July 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं येत्या २०३० साला पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय रिकाम्या भूखंडांवर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार करणारे प्रकल्प सुरु करणार आहे.

उत्तर प्रदेशात रायबरेली इथं तसंच मध्य प्रदेशात बिना इथल्या प्रकल्पांमधून सौर ऊर्जेचा पुरवठा येत्या १५ दिवसांत सुरु होईल. देशातली रेल्वे यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी अशा अनेक प्रकल्पांमधून मिळणारी ऊर्जा पुरेशी असून रेल्वे आता या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यासाठी रेल्वे ऊर्जा व्यवस्थापन कंपनी आता निविदा काढत आहे.