भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु
July 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधे झालेल्या सहमतीनंतर लदाख इथल्या हॉट स्प्रिंग क्षेत्रातल्या गस्ती नाका १७ इथून भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

तिथल्या फिंगर या क्षेत्रातल्या आपल्या सैनिकांची संख्याही चीननं कमी केली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.