भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत - ट्रम्प
July 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात त्यांची जशी वर्तणूक असते तशीच आहे आणि त्यावरून चिनी कम्युनिस्ट पक्षाचं खरं स्वरूप उघड होतं असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचं व्हाईट हाऊसचे प्रवक्ता केली मॅकेनी यांनी आज सांगितलं.

गेल्या 2 महिन्यात भारतीय सीमेवर केलेल्या कागाळी व्यतिरिक्त चिननं हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेवर आणलेल्या मर्यादा आणि दक्षिण चिनी सागर क्षेत्रातील व्हिएतनाम सारख्या देशांसद्रर्भातल्या आक्रमक धोरणाच्या पार्श्वभुमीवर ट्रम्प यांची ही प्रतिक्रीया महत्वाची ठरते.