मंदिर उघडण्यासाठीच्या धार्मिक संघटनांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
October 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिर उघडावी यासाठी विविध धार्मिक संघटनांनी येत्या १३ तारखेला पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला प्रदेश भाजपाने पाठिंबा जाहिर केली आहे.

राज्य सरकारनं दारुची दुकानं, तसंच बार आणि उपाहारगृहही उघडायला परवानगी दिली आहे, मात्र मंदिर आणि इतर धार्मिक स्थळं गेले सात महिने बंद ठेवली आहेत, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध  केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

धार्मिक संघटनांच्या येत्या  १३ तारखेच्या उपोषणादरम्यान राज्यभर भाजपा कार्यकर्ते आपापल्या  जिल्ह्यामधल्या मंदीराबाहेर आंदोलन करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.