मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संघटनांचा आंदोलन करण्याचा निर्णय
August 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी येत्या बुधवारपासून पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे. नाशिक इथं झालेल्या मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

शिवसंग्राम संघटनेचे  नेते आमदार विनायक मेटे यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं भूमिका स्पष्ट करावी, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सक्षम विधीज्ञांची नेमणूक, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

दरम्यान मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यायला  महाविकास आघाडी सरकार प्रतिबद्ध असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीनं मांडत नसल्याच्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या आरोपाचही त्यांनी खंडन केलं.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणावरील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सर्व संबंधितांच्या संपर्कात आहेत असंही ते म्हणाले.