माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह
August 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला असून, रुग्णालयात काही अन्य उपचारासाठी गेल्यावर आपली कोरोना निदान चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व  व्यक्तींनी आपली कोरोना निदान चाचणी करून घ्यावी, तसंच त्यांनी स्वयं - विलगीकरणात जावं, अशी विनंती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर संदेशात केली आहे.