माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं प्रकृती बिघडली
August 19, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं, त्यांची प्रकृती बिघडल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे कोमात असून, कृत्रीम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. मुखर्जी यांना कोरोना विषाणूचा संसर्गही झालेला आहे.