मास्क, सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य - राजेश टोपे
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू पासून संरक्षण करणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती नियंत्रणात ठेवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. मास्क आणि सॅनिटायझर भरमसाठ किमतीला विरले जात आहेत, या गोष्टीची नोंद सरकारनं घालायचं ते म्हणाले .

या वस्तूंच्या दर्जावर आधारित किंमत लवकरच निश्चिरत केले जाईल आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्यावर जातील असंही ते यावेळी म्हणाले. कोरोना निदाच चाचणीचं शुल्क प्रत्येक १ हजार ९०० रूपये इतकं निश्चित करण्यात असल्याचं त्यांनी  सांगितलं.

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबतचा निर्णय केंद्रसरकार घेईल, तसंच कोरोनाबाबत परिस्थिति लक्षात घेऊन उपाहारगृह आणि जिम्नॅशिअम सुरु होतील, असं टोपे यांनी सांगितलं.