मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ८६ दिवसांवर पोचला
October 18, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल दिवसभरात २ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या मुंबईतलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं ८६ टक्क्यावर स्थीर आहे. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ८ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

मुंबईत काल सतराशे ९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे मुंबतल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४० हजार ३३९ झाली आहे.

काल मुंबईत ४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ९ हजार ६८२ झाली आहे. सध्या मुंबईत १८ हजार ७१७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ८६ दिवसांवर पोचला आहे अशी माहिती मुंबई महानगर पालिका प्रशासनानं दिली आहे.