मुंबईतल्या भानुशाली ईमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० वर
July 17, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली : मुंबईतल्या फोर्ट विभागात काल भानुशाली या ईमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १० झाली आहे.

आज जे जे रुग्णालयात दाखल असलेल्या एका १७ वर्षीय युवकाचा मृत्यु झाला. आज सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह हाती लागले.

या दुर्घटनेत जखमी असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ईमारतीचा एक भाग काल कोसळला होता.

धोकादायक बनलेल्या या ईमारतीचा काही भाग  म्हाडाने रिकामा केला होता. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे काही कुटुंबे या ईमारतीत पुन्हा राहायला आली होती असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.