मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
August 29, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढायला परवानगी नाही, असं न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण आणि उत्सवांवर सरकारनं बंधनं घातली आहेत. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे.