मुंबईत वरळी इथून एन ९५ मास्कचा साठा जप्त
August 22, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत वरळी इथून पोलिसांनी २७ लाख रुपये किमतीच्या बनावट एन ९५ मास्कचा साठा जप्त केला. वरळी परिसरात नुतन बाणेश्वर मंदिर इथं बनावट मास्कच्या विक्रीसाठी टेम्पोतून आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या मास्कची अंदाजित रक्कम २७ लाख रुपये आहे.

जप्त केलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असून ते एका नामांकित कंपनीच्या नावानं बाजारात आणल्याचं आढळून आलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयानं त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.