मुंबई शहरात काल मध्यरात्री पासून कलम 144 लागू
September 18, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहाता मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री पासून शहरात कलम 144 लागू केलं आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून  ४ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

ही जमावबंदी असून नवीन टाळेबंदी नाही, असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. दरम्यान ही जमावबंदी म्हणजे नवे निर्बंध नाहीत असं मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.