मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक ३२७ अंकांची वाढ
October 9, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज सलग सातव्या सत्रात उलाढालीचा भर खरेदीवर राहिला. त्यामुळे दिवसअखेर निर्देशांक ३२७ अंकांची वाढ नोंदवत ४० हजार ५०९ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ८० अंकांची वाढ झाली आणि तो ११ हजार ९१४ अंकांवर बंद झाला.

चलन बाजारात आज रुपया ८ पैशानी वधारला. विनिमय दर प्रति डॉलर ७३ रुपये १५ पैसे राहिला.