मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
August 20, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच ‘सद्भावना’ दिवसानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञाही दिली.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि संगणकाचे युग आणल्याने आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांचे हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. ‘सद्भावना दिवस’ म्हणून त्यांचे स्मरण करताना स्वर्गीय राजीवजींना विनम्र अभिवादन.