यंदा गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी न मागण्याचा पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांचा निर्णय
August 5, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या मंडळांकडून सांगण्यात आलं आहे.