राज्यातल्या शाळा दिवाळीनंतर सुरू होणार
October 9, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा येत्या १५ ऑक्टोबरला सुरु करण्याऐवजी दिवाळी झाल्यावर सुरू करण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाला दिले.