राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
July 25, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या काळात ९३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला, त्यात ७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ६ हजार ३१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, २१४ अधिकाऱ्यांसह १ हजार ६११ पोलिस कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मृत्यु पावलेल्या ९३ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ५२ जण मुंबईतले आहेत. 

टाळेबंदी घोषित झाल्यापासून आतापर्यंत २ लाख ७ हजार ५४३ गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांनी ३१ हजार ६७१ जणांना अटक केली आहे. टाळेबंदी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ कोटी ८७ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे.