राज्यात काल ७ हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद
July 5, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे एकंदर ३ हजार ३९५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. त्यामुळे कोविड-१९ मधून बरे झालेल्यांची एकंदर संख्या आता १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५४ पूर्णांक २ शतांश टक्क्यावर पोहोचलं आहे.

सध्या राज्यात विविध ठिकाणी ८३ हजार २९५ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत.

काल ७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातली कोरोना बाधितांची संख्या २ लाख ६४ इतकी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ८ हजार ६७१ रुग्ण दगावले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर राज्यात ४ पूर्णांक ३३ शतांक टक्के इतका आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ जणांनी कोरोनावर मात केली असून  या सर्वाना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.   जिल्ह्यात सध्या  ७० जण कोरोना पॉझिटिव्ह  असून जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या  २४२ झाली आहे. आतापर्यंत १६६ जण उपचारानंतर बरे झाले, तर ५ जणांचा मृत्यू झाला.  

बीड जिल्ह्यात काल  कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १३१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत 113 रूग्ण उपचारानंतर बरे होऊन  घरी गेले,  तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  

सातारा  जिल्ह्यात काल  ४८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1हजार 304 इतकी झाली आहे.

काल  4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू  झाल्यानं जिल्ह्यात  मृतांचा आकडा ५५ वर पोहोचला आहे, तर आतापर्यंत 784 जण उपचारानंतर  कोरोना रुग्ण झाले.  

लातूर जिल्ह्यात काल १३ जण कोरोनमुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.  जिल्ह्यात सध्या  उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 173 आहे,  242 जण बरे झाले, तर  20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या  428  वर पोहोचली आहे. 

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे  १६९ नवे  रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ हजार १७६ वर पोहोचला आहे.

परभणी जिल्ह्यात  कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आले असून  जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण  संख्या 143 झाली आहे. 

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता   जुलै महिन्यात दर शनिवार- रविवार शहरात जनता जमावबंदी राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.  

जिल्ह्यात आज 21 रुग्ण कोरोना  पॉझिटिव्ह आढळून आले  असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 692 वर पोहचली आहे.  उपचार घेऊन बरे होणाऱ्याची संख्या 447 आहे, तर  सध्या  207  रुग्ण उपचार घेत आहेत. 

नांदेड जिल्ह्यात आज ५ नवे  कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची    एकूण  संख्या आता ४२८ झाली आहे. जिल्ह्यात  आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 128 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. असून कोरोनाबाधितांचा  एकूण आकडा 6 हजार 641 वर पोहोचला आहे. आतापर्यंत  3 हजार 241 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, तर  300 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  सध्या  3 हजार 100 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं  जिल्हा प्रशासनानं  कळविलं  आहे.  

परभणी शहरातल्या विष्णुनगर भागात आज  एक नागरिक कारोंनाबाधीत आढळून आल्यानं जिल्ह्यात  कोरोंनाबाधीत रुग्णांची एकूण  संख्या 143 झाली आहे.

धुळे शहरातल्या  नगावबारी इथल्या एका  कोविड केअर सेंटर मधून काल  संध्याकाळी १५  रुग्ण पळून गेले असून रुग्णालय प्रशासनानं याबाबत पोलीस स्थानकात  तक्रार दाखल केली आहे.