राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक
August 29, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनाला सादर करावीत.

त्याआधारे जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईतल्या जिम चालकांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिम चालकांना सूचना केल्या.