राज्य लोक सेवा आयोगानं विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची दिली संधी
August 19, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमपीएससी, अर्थात राज्य लोक सेवा आयोगानं, ११ ऑक्टोचबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे.

तर २० सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातल्या उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.