राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार
July 28, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२० मधे घेतलेल्या इ.१० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली. विद्यार्थी आपला निकाल  www.mahresult.nic.in किंवा www.sscresult.mkcl.org या वेबसाईटवर पाहू शकतात.