राज ठाकरे यांची त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट
August 17, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्य सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय अजूनही घेतला नसल्यानं त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.

‘महाराष्ट्रातली मॉल्स जर उघडू शकतात, मग मंदिरं का उघडली जात नाही?  एका वेळेला मंदिरात किती जणांना प्रवेश मिळेल ? पूजा कशा होणार? अशा विषयावर  त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांसोबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन देसाईही उपस्थित होते.