राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले
August 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले आहेत. अयोध्या दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. २७ जुलैला ही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यात ही रक्कम टाकण्यात आल्याचं शिवसेनेनं ट्विटरवर जाहीर केलं आहे.

शिवसेनेकडून कुठलीही मदत देण्यात आली नसल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.