राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
August 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळं अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांना मी नमन करतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केलं. 

हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. सामाजिक सलोखा हे रामाच्या प्रशासनाचं मूलभूत अंग होतं. 

राम मंदिराची निर्मिती ही देशाच्या एकतेसाठी महत्त्वाची आहे. या राम मंदिरामुळं या संपूर्ण क्षेत्रातल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले.