लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने डेअरी फार्म परिसरात वृक्षारोपण
August 21, 2020 • महेश आनंदा लोंढे

पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात शुक्रवारी (दि. २१) वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, लायन्स क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नेहुल कुदळे, शहर भाजप उपाध्यक्ष कमल मलकानी, हरीश मंधान, गणेश ढाकणे, पिंटू मिरानी, सुशील बजाज, सुरेंद्र मंगवाणी, सौरभ आदी उपस्थित होते.

डेअरी फार्म परिसरात १०५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. क्लबचे अध्यक्ष नेहुल कुदळे यांनी आभार मानले.