लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्योगमंत्र्यांची आदरांजली
August 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आदरांजली वाहिली.

लोकमान्य टिळकांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी टिळकांच्या दुर्मिळ ग्रंथ साहित्याचे प्रकाशन शासनामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.