लोकसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्राथमिक स्तरावरील फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याचं उदघाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं. सध्याच्या काळात  वेगवेगळ्या भाषाचं ज्ञान असणं महत्त्वाचं असून, वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी या कौशल्याची आवशयकतय आहे, भाषेमुळ  लोक एकत्र येतात आणि त्यांची कौशल्य, कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते; असं मत बिर्ला यांनी या वेळी व्यक्त केलं.

संसदेच्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे या अभ्यासक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याबद्दल बिर्ला यांनी या संस्थेचं कौतुक केलं, आगामी काळात जर्मन, स्पॅनिश , रशियन आणि इतर भाषांचे अभ्यासक्रमही आयोजीत करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या अभ्यासक्रमासाठी ५७ जणांनी नोंदणी केली आहे.