वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित होणार चित्रपटाची निर्मिती
October 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तयार केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित चित्रपटही तयार होत असून दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतील, असं बांगलादेशचे माहितीमंत्री डॉक्टर हसन मेहमूद यांनी काल ढाका इथं सांगितलं. भारताचे बांगलादेशमधील नवनियुक्त उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी काल ढाका इथं मेहमूद यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.