वाढीव विज बिलं मिळालेल्या ग्राहकांना बेस्ट व्याजासाहित परतावा देणार
July 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात जास्त रकमेची विजेची बिलं दिलेल्या ग्राहकांना त्यांच्या रकमेचा व्याजासाहित परतावा त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे. यामुळे, वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सहन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

वीज ग्राहकांना दिलेली वीज बिलं अंदाजित दिली असून मार्च महिन्याच्या विजेच्या वापराच्या आधारे ही बिलं दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली आहे.