व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जाहीर
September 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.

युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे  पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.

द डिसायपल हा चित्रपट शास्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत  असून गेल्या आठवड्यात हा चित्रपट व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आल्यानंतर तिथल्या समीक्षकांनी आणि तज्ञांनी गौरवला होता.