शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन
October 5, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल नाफेड तर्फे हमीभाव विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन आखाडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता संजय भंडारे यांनी केलं आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मुग, उडीदची खरेदी १ ऑक्टोबर, तर सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. यामध्ये उडीद ६ हजार रुपये, मुग ७ हजार १९६ रुपये, सोयाबीन ३ हजार ८८० रुपये हमीभावानं खरेदी केली जाणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.