सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घेण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना
August 23, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 मधे समाविष्ट करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत निर्धारीत केलेल्या शिध्याचं वाटप तात्काळ करावं, असंही म्हटलं आहे.

ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजुनही सामील केलेलं नाही त्यांच्या शिधापत्रीका तात्काळ बनवाव्यात, अशाही सूचना केंद्रानं दिल्या आहेत.