सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार
July 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इथल्या स्थानिक प्रशासनाकडून अशा मजुरांच्या कुटुंबियांची माहिती मागवली आहे.

कोरोनाप्रादुर्भावाच्या काळात संकटात सापडलेल्यांना मदत करणं ही माझी जबाबदारी असल्याचंही त्याने म्हटलं आहे.