सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ
August 19, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात १ हजार ४३० रुपयांची वाढ होऊन तो ५४ हजार ४३० वर पोहोचला असून चांदीच्या दरातही १ हजार ९०० रुपयांची वाढ होऊन ती किलोमागे ७१ हजार ९०० रुपयांवर पोहोचली. 

दिल्लीच्या सराफा बाजारात मात्र सोने ६४० रुपयांनी घसरले. आज सोन्याचा भाव प्रती दहाग्रॅम ५४ हजार २५९ रुपये झाला.  चांदीच्या दरातही किलोमागे ३ हजार ११२ रुपयांची घसरण होऊन ती ६९ हजार ४५० रुपयावर आली. 

मुंबई शेअर बाजारात आज केवळ ८६ अंकांची वाढ होऊन तो ३८ हजार ६१५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३ अंकांनी वाढून ११ हजार ४०८ अंकांवर बंद झाला.