हिरो सायकल कंपनीन चीन बरोबरचा व्यापार करार रद्द केला
July 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरो सायकल कंपनीन चीन बरोबरचा 900 कोटी रुपयांचा व्यापार करार रद्द केला आहे. कंपनीचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी सांगितल की कंपनीने यापुढे चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील अन्य देशांशी सहकार्य करून उच्च दर्ज्याच्या सायकलींच उत्पादन  करू असंही त्यांनी म्हटलं आहे.